कढीपत्त्याच्या सेवनाचे फायदे
प्रत्येक पदार्थाची चव वाढवणारा कढीपत्ता प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात सहज दिसून येतो.
कढीपत्ता खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. कढीपत्ता खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. अपचन, गॅस यांसारख्या समस्या दूर होतात.
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियमितपणे कढीपत्त्याचं सेवन करावं.
कढीपत्त्यामुळे शरीरातील बँड कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत मिळते.
सांधेदुखी, सूज, वेदना यावर कढीपत्त्यातील नैसर्गिक दाहरोधी घटक लाभदायक आहेत.
कडीपत्त्यात विटामिन C, A, E आणि अन्य काही अँटीऑक्सिडंट संयुगे असतात. हे शरीरातील फ्री-रॅडिकल्स कमी करून रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.