बऱ्याचदा काय होतं कोथिंबीर घरी आणली की ती २ दिवसातच वाळून जाते.
प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात कोथिंबीर ही असतेच असते. पदार्थाची चव, सुवास वाढवणारी ही कोथिंबीर गुणकारी सुद्धा आहे.
बऱ्याचदा काय होतं कोथिंबीर घरी आणली की ती २ दिवसातच वाळून जाते. त्यामुळेच आता आठवडाभर ही कोथिंबीर कशी ताजी ठेवता येईल याच्या काही टिप्स पाहुयात.
कोथिंबीर स्टोर करण्यापूर्वी ती कधीच धुवून घेऊ नका. जर तुम्ही कोथिंबीर धुवून घेतली तर त्यात पाणी राहतं आणि ती सडून जाते.
कोथिंबीर कायम निवडून मगच स्टोर करा. यात पिवळी झालेली किंवा थोडीशी चिकट झालेली कोथिंबीर पहिले टाकून द्या.
कोथिंबीर धुतल्यावर तिला छान पसरवून ठेवा. ती पूर्ण कोरडी झाल्यावरच मग डब्यात भरा.
कोथिंबीर डब्यात ठेवण्यापूर्वी टिश्शू पेपर किंवा नॅपकिनमध्ये गुंडाळा.