पोळी दिवसभर मऊसूत राहण्यासाठी काही खास टीप्स पाहुयात.
जेवणाच्या ताटात भात जितका महत्त्वाचा तितकंच महत्त्व पोळीला सुद्धा आहे. परंतु, अनेकदा सकाळी केलेल्या पोळ्या दुपारपर्यंत कडक किंवा वातट होतात.
कणकेमध्ये पाण्याऐवजी थोडं दूध मिक्स करावं. यामुळे पोळी मऊसूत होण्यास मदत मिळते.
फुलका रोटीऐवजी पारंपरिक पद्धतीने तेल लावून केली जाणारी घडीची पोळी करावी.
पोळीची कणिक व्यवस्थित मळावी. निदान १०-१५ मिनिटे तरी कणिक मळली पाहिजे.
मळलेली कणिक १५-२० मिनिटे ओल्या कापडाखाली झाकून ठेवावी.
पोळी भाजतांना तवा व्यवस्थित तापवून घ्यावा.