खरेदी केलेली चप्पल किंवा सँडल जर टाइट होत असेल तर ती सैल कशी करावी याच्या काही टिप्स पाहुयात.
सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. त्यामुळे अगदी स्वयंपाक घरातील गोष्टींपासून ते लाइफस्टाइलपर्यंत अनेक गोष्टी सहज ऑनलाइन ऑर्डर करता येतात.
काही वेळा शूज किंवा सँडलची ऑनलाइन खरेदी केल्यानंतर त्याचं माप देतांना गल्लत होते. आणि, मग चुकीच्या मापाचे सँडल आपल्या पदरात पडतात.
पायात सॉक्स घाला आणि त्यावर शूज, चप्पल घाला. त्यानंतर हेअर ड्रायर चालू करुन त्याची वाफ चप्पलवर फिरवा. शूज आपोआप लूज होतील.
व्हिनेगर आणि पाणी एकत्र करुन एका स्प्रे बाटलीत भरा. हे पाणी टाइट झालेल्या शूजवर शिंपडा. यामुळे सुद्धा शूज लूज होतील.
टाइट झालेले शूज पायात घालून घरातल्या घरात १०-२० मिनिटे चाला. यामुळे त्यांच्यातील कडकपणा कमी होऊन ते सैल होतील.