भूकंप येण्याआधी अनेकदा प्राणी विचित्र हालचाली करतात. हा योगायोग आहे की सायन्स?
जपान, चीन, ग्रीस या देशांत शेकडो वर्षांपूर्वीपासून नोंदी आहेत की, भूकंप येण्याआधी प्राणी असामान्य वागले.
भूकंप येण्याआधी कुत्री सतत भुंकतात, अस्वस्थ होतात. कुत्र्यांच्या हालचाली बदलतात.
चीनमध्ये झालेल्या अभ्यासात दिसून आलं की, भूकंपाआधी साप हिवाळ्यातल्या बिळातून बाहेर आले हाेते.
प्राण्यांनाच नाही, तर पक्ष्यांनाही संकेत मिळतात. पक्ष्यांचा थवा अचानक दिशा बदलताे. किंवा झाडावरून उडून जातो.
भूकंप येण्याच्या आधी जमिनीतून खूप कमी frequency चे ध्वनी (infrasound) तयार होतात.
या ध्वनी लहरींचा आवाज इतका साैम्य असताे, की ताे माणसांना ऐकू येत नाही, पण प्राण्यांना जाणवतात.
जमिनीतील tectonic हालचालींमुळे electromagnetic waves निर्माण होतात. पक्षी, प्राणी या लहरी जाणवतात.
माशांसारखे जलचर प्राणी भूकंपाआधी पाण्यात अस्वस्थ होतात. कारण पाण्यातील दाब आणि रासायनिक बदल त्यांना लवकर जाणवतात.
प्राणी हे निसर्गाचे अलार्म सिस्टीम आहेत. भूकंप कधी येणार हे त्यांना आधीच जाणवते. पण त्यामागे सायन्स अजूनही शोध घेत आहे.