तरुणांमध्ये वाढतोय अल्झायमर्सचा धोका

हा आजार टाळण्यासाटी काय करावं? डॉक्टर सांगतात...

लोकांना अल्झायमर्स आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी 21 सप्टेंबरला वर्ल्ड 'अल्झायमर्स' डे साजरा केला जातो.

अल्झायमर्स सामान्यतः वृद्ध लोकांमध्ये होणारा आजार आहे, मात्र आता हा युवकांमध्येही वाढतोय. याला अर्ली ऑनसेट अल्झायमर्स म्हणतात.

हा आजार स्मरणशक्ती कमी होणे आणि रोजच्या कामांमध्ये अडचण निर्माण करणारा आजार आहे.

कारणे: जीवनशैलीतील बदल, स्ट्रेस, झोप कमी होणे, डायबिटीज, स्थुलपणा, हाय ब्लड प्रेशर, धूम्रपान आणि अनहेल्दी डायट.

बचाव: रोज ३० मिनिटे व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

ब्रेन बूस्ट करणाऱ्या एक्टिविटीज आणि मेमरी सुधारक खेळांवर लक्ष केंद्रीत करा.

सोशल मीडियाचा मर्यादित वापरा करा आणि जीवनशैलीशी संबंधित रिस्क फॅक्टर्स नियंत्रित ठेवा.

डॉक्टरांचा सल्ला आहे की, जीवनशैली सुधारल्यास आजाराची जोखीम कमी करता येते आणि मेंटल फिटनेस टिकवता येतो.

Click Here