वायरलेस हेडफोन्समुळे येऊ शकतो बहिरेपणा? 

हेडफोन्समुळे कॉलवर बोलणं किंवा गाणी ऐकणं कितीही चांगलं वाटत असलं तरीदेखील त्याचे तोटेही तितकेच आहेत.

हेडफोन्स वापरणं आता कॉमन गोष्ट झाली आहे. रस्त्यात चालतांना, अगदी रात्री झोपेपर्यंत सुद्धा अनेक जण कानात हेडफोन्स घालून असतात.

हेडफोन्समुळे कॉलवर बोलणं किंवा गाणी ऐकणं कितीही चांगलं वाटत असलं तरीदेखील त्याचे तोटेही तितकेच आहेत.

वायरलेस हेडफोन्स सतत वापरल्यामुळे कानांना इजा पोहचू शकते. यामुळे आपल्या ऐकण्याची क्षमता कमी होते.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरात जवळपास ४३ कोटी लोकांना ऐकण्याविषयी गंभीर समस्या आहे. 

वायरलेस हेडफोन्स वापरल्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतोच. सोबतच कानात घाम आणि बॅक्टेरियादेखील जमा होतात. यामुळे कानात इन्फेक्शन होऊ शकतं.

घरात मांजर पाळण्याचे फायदे आणि तोटे

Click Here