बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा आहेत गुणकारी, त्वचाविकार होतील दूर
दुर्वांचे आयुर्वेदिक फायदे
गणपती बाप्पाला आवडणाऱ्या हिरव्यागार दुर्वांना जितकं आध्यात्मात महत्त्व आहे. तितकंच त्यांना आयुर्वेदातही महत्त्वाचं स्थान आहे.
दुर्वा अनेक आजारांमध्ये औषध म्हणून वापरल्या जातात. त्यामुळे पोटदुखीपासून ते त्वचाविकारापर्यंत अनेक समस्यांमध्ये त्यांचा वापर होतो.
दुर्वांमध्ये प्रोटिन्स, कार्बोहायड्रेडस, कॅल्शियम, फायबर आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात.
उन्हाळ्यात जर उष्णतेमुळे नाकातून रक्त येत असेल तर दुर्वांच्या रसाचे काही थेंब नाकात सोडा. यामुळे रक्त येणं थांबतं.
उष्णतेमुळे जर तोंडांत फोड आले असतील तर दुर्वांचा रस पाण्यात मिक्स करा. त्यानंतर या पाण्याने चूळ भरा. यामुळे तोंडात होणारी आग कमी होते. तसंच फोडही बरे होतात.
पचनक्रियेशी निगडीत समस्या असतील तर दररोज १ चमचा दुर्वांचा रस प्यावा. तसंच दुर्वांच्या रसाचं सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
त्वचेसंबंधित कोणत्या तक्रारी असतील तर दुर्वा वाटून त्याचा लेप संबंधित जागेवर लावावा. यामुळे खरुज, नायटा यांसारख्या त्वचेच्या समस्या दूर होतात.