संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण म्हणजे दसरा.
या दिवशी खासकरुन नवीन वस्तू आणि सोन्याची खरेदी केली जाते.
दसऱ्याला सोन्यासोबतच सर्वाधिक खरेदी केली जाणारी वस्तू म्हणजे गाडी.
दसऱ्याला वाहनाची पूजा करण्यासोबतच वाहन धुतातदेखील. परंतु, दसऱ्याला वाहन खरेदीची आणि ते धुण्याची परंपरा नेमकी कुठून आली ते पाहुयात.
विजयादशमीला एकीकडे दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला. तर दुसरीकडे प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून विजयोत्सव साजरा केला जातो.
प्रभू रामांनी रावणाचा वध केल्यानंतर त्यांना या कार्यात मदत करणाऱ्यांचे, तसंच सर्व निर्जीव रुपातील वस्तुंचे आभार मानले.
यात सर्वप्रकारचे शस्त्र, अस्त्र, रथ आणि सर्वप्रकारचे वाहने यांच्याप्रतीही आभार मानले होते. त्यामुळे आपणदेखील प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये, वाहन सुरक्षित रहावं यासाठी वाहनाची पूजा करतो.