अचानक जमिन हालायला लागली, घरातल्या वस्तू हलायला लागल्या तर? घाबरायला हाेत. पण, शांत डाेक्याने निर्णय घेतल्यास सहज स्वतःला आणि दुसऱ्यांना सुरक्षित ठेवू शकता.
भूकंप हाेताे ही वेळ काही सेकंदाची असते. जमिनीतून आवाज येताे, घर, इमारती हलत असतात. शांत रहा आणि स्वतः सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा.
टेबल खाली किंवा काॅटखाली लपा. डाेक आणि मानेला इजा हाेणार नाही, याची काळजी घ्या.
भिंती, खिडक्या, दाराच्या चाैकटीपासून लांब उभे रहा. डाेक्यावर काही पडणार नाही याची काळजी घ्या.
बाहेर असाल तर ब्लिल्डिंग, इलेक्ट्रिक वायर, झाडे, पुलापासून लांब माेकळ्या जागी उभे रहा.
भूकंपामध्ये कधी पळू नका. जिन्यांवर धावत जाणे टाळा. पळणे घातक ठरू शकते.
लिफ्टचा वापर टाळा. लिफ्टमध्ये असाल तर बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका, मदत मागा.
भूकंप संपल्यावर इमारत, लाईट, गॅस पाईपलाईन सगळ व्यवस्थित आहे ना? ते तपासून पहा.
जखमा झाका, रक्तस्त्राव थांबवा. शक्य असल्यास पाणी प्या. तत्काळ औषधाेपचार घ्या.
स्वतःजवळ मेडिकल किट, खाण्याचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या यांचा साठा करून ठेवा.
ओळखपत्र, महत्त्वाची कागदपत्र, टाॅर्च अशा महत्त्वाच्या गाेष्टी एकत्र करून ठेवा.