दिवसभर एनर्जेटिक रहायचंय? तर प्या शेवग्याच्या पानांचं पाणी
शेवग्याच्या शेंगांप्रमाणेच त्याची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यवर्धक आहे.
शेवग्याची शेंग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असे अनेक पोषक घटक असतात जे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात.
शेवग्याची शेंग सुपरफूड मानली जाते. शेवग्याच्या शेंगांप्रमाणेच त्याची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यवर्धक आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास फायदेशीर ठरू शकते.
शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-ए, सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह यांसारखे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.
शेवग्याच्या पानांचं पाणी प्यायल्यास शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते. तसंच रक्ताची कमतरतादेखील दूर होते.
शेवग्याच्या पानांमुळे पचनसंस्था मजबूत होते. तसंच या पानांमध्ये असलेल्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात.
शेवग्याच्या पानांचं पाणी प्यायल्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होते.
शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात , जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.