राेज सकाळी उठल्यावर शेवग्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास शरीराला फायदे मिळतात. तुमच्या रूटीनमध्ये नक्की याचा समावेश करा.
शेवग्यामध्ये व्हिटॅमिन-ए, सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह यांसारखी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.
राेज सकाळी रिकाम्या पाेटी शेवग्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास शरीराला काय फायदे मिळतात, ते पाहू या.
शेवग्याच्या पानांपासून तयार केलेल्या पाण्यात लोह आणि जीवनसत्त्वे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करतात.
शेवग्याचे पाणी प्यायल्याने थकवा कमी होतो आणि उर्जेची पातळी वाढते. सकाळी हे पाणी प्यायल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहता.
शेवग्याच्या पानांचे पाणी पचनसंस्थेचे कार्य सुधारते. फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्या कमी हाेते, पाेट साफ हाेते.
शेवग्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि जास्त पाेषण मिळते. त्यामुळे हे पेय वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शेवग्यातील गुणधर्म त्वचा चांगली तजेलदार करतात. केसांच्या वाढीसाठी आवश्यक पाेषक मूल्यांमुळे केसांना पाेषण मिळते.