शक्यतो वर्कआऊट करताना पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो.
जीममध्ये व्यायाम करतांना सहाजिकच अनेकदा घशाला कोरड पडते. ज्यामुळे वारंवार पाणी पिण्याची इच्छा होते.
वर्कआऊट करतांना तहान लागणं ही कॉमन गोष्ट आहे. मात्र, व्यायाम सुरु असतांना पाणी पिण्याचे काही दुष्परिणामही आहेत.
शक्यतो वर्कआऊट करताना पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो. त्यामागची काही कारणं पाहुयात.
व्यायाम करतांना शरीराचं तापमान वाढलेलं असतं. अशावेळी गार पाणी प्यायल्यास electrolyte depletion ची शक्यता असते.
व्यायाम करतांना पाणी प्यायलं तर डोकंदुखी, मळमळ, थकवा असा त्रास होऊ शकतो.
व्यायाम करतेवेळी अगदीच तहान लागली तर कोमट पाणी प्यावं. तसंच एकदम न पिता घोट घोट प्यावे.