झोपेतून उठताच जास्त पाणी पिणे किडनीसाठी धोकादायक ठरेल.
सकाळी उठल्यावर पाणी पिणे, आरोग्यासाठी चांगले आहे. किडनीच्या योग्य कार्यासाठी पाणी महत्वाचे आहे.
भरपूर पाणी पिल्याने शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि किडनीला जास्त मेहनत करावी लागत नाही.
म्हणूनच, प्रत्येकाने दिवसभरात किमान ३ लिटर पाणी प्यायला हवे. पाण्यासोबतच, आहारात इतर द्रवपदार्थांचाही समावेश करावा.
सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे खूप आरोग्यदायी आहे. मात्र, पण सकाळी जास्त पाणी पिल्याने किडनीवर दबाव येऊ शकतो.
अनेकजण सकाळी १-२ बाटल्या पाणी पितात. डॉक्टर ही सवय योग्य मानत नाहीत. तुम्ही दिवसाची सुरुवात १-२ ग्लास कोमट पाणी पिऊन करावी.
यामुळे तुमच्या शरीराला जास्तीत जास्त फायदा होईल. काही लोक ऑफिसमध्ये काम करताना पाणी पिणे विसरतात किंवा आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात.
कमी पाणी पिल्याने शरीरात घातक पदार्थ जमा होऊ शकतात. पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे दिवसभरात तुम्ही पित असलेल्या ३ लिटर पाण्याचे वाटप करणे.
सकाळी उठल्यानंतर २ ग्लास पाणी प्या. प्रत्येक जेवणापूर्वी १ ग्लास पाणी प्या. जेवणानंतर अर्धा तासाने १ ग्लास पाणी प्या. रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास कोमट पाणी प्या.
काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही? मग 'हा' घ्या स्मार्ट मार्ग; २१-२१-२१ नियम सर्वात बेस्ट