चहा घेणं चुकीचं नाही परंतु, त्याचे काही नियम पाळले तर चहा प्यायल्यामुळे होणारे शारीरिक नुकसान नक्कीच टाळू शकतो.
'चहाला वेळ नसते. पण, वेळेला चहा हवाच', असं म्हणून सर्रास कोणत्याही वेळी आपण सहज चहा घेतो.
चहा घेणं चुकीचं नाही परंतु, त्याचे काही नियम पाळले तर चहा प्यायल्यामुळे होणारे शारीरिक नुकसान नक्कीच टाळू शकतो.
चहा एकदाच गरम करावा. अनेकदा एकाच वेळी भरपूर चहा केला जातो आणि तोच पुन्हा पुन्हा गरम करुन प्रत्येकाला दिला जातो. परंतु, वारंवार चहा उकळल्यामुळे त्याच्यात विष निर्मिती होते.
चहा दिवसातून कमीत कमी २ वेळा प्यावा. जास्त वेळा प्यायला तर पित्ताची समस्या निर्माण होते.
चहाची चव वाढवण्यासाठी आपण त्यात सुंठ, गवती चहा, तुळस किंवा चहाचा मसाला टाकतो. परंतु, त्यामुळे चहा उष्ण प्रकृतीचा होतो. परिणामी, तोंडात फोड येणे, अल्सर या समस्या होतात.
कोरा चहा कधीही पिऊ नये. हा चहा शरीरासाठी जास्त हानीकारक असतो.