कमी पाणी प्यायल्यामुळे उद्भवतात 'या' शारीरिक समस्या

शरीराला ज्याप्रमाणे घनपदार्थांची गरज असते. त्याचप्रमाणे पुरेसं पाणीदेखील शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. 

शरीराचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आपली आहारपद्धती योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे.

शरीराला ज्याप्रमाणे घनपदार्थांची गरज असते. त्याचप्रमाणे पुरेसं पाणीदेखील शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. परंतु, जर हेच पाणी शरीरात कमी पडलं तर अनेक शारीरिक व्याधी डोकं वर काढतात.

पुरेसं पाणी न प्यायल्यास श्वासातील दुर्गंधी वाढते. पाणी न प्यायल्यामुळ तोंड कोरडं पडतं. परिणामी, तोंडात जंतू वाढतात आणि तोंडाचा वास येतो. मात्र, पाणी प्यायल्यामुळ तोंड ओलसर व स्वच्छ राहतं.

केसांच्या वाढीसाठी पाणी गरजेचं आहे. पाणी प्यायल्यामुळे टाळू आणि केसांपर्यंत पोषणद्रव्यांचं योग्यरित्या वहन होतं. मात्र, पाणी कमी प्यायल्यास केसगळतीची समस्या निर्माण होऊ शकते.

पुरेसं पाणी न प्यायल्यामुळे अॅनिमियाची समस्या उद्भवू शकते. पाण्यामुळे शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. त्यामुळे पाणी पिणं गरजेचं आहे.

पाणी न प्यायल्यामुळे चिडचिड होणे, डोकेदुखी, मूड बदलणे यांसारख्या समस्या जाणवतात.

सकाळी उठल्याबरोबर गॅसची समस्या येते? ही त्याची लक्षणे असू शकतात

Click Here