डाएट सोडा आहे मेंदूसाठी घातक?

डाएट सोडा पिणं अनेक जण सुरक्षित मानतात. परंतु, हा सोडा देखील शरीरासाठी तितकाच घातक आहे.

चुकीच्या आहारपद्धतीचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे सध्या अनेक जण त्यांच्या आहाराविषयी जागृत झाले आहेत.

बऱ्याच लोकांनी कोल्ड्रींग पिणं पूर्णपणे बंद केलं आहे. मात्र, तरीदेखील काही जण डाएट सोडा पितात.

डाएट सोडा पिणं अनेक जण सुरक्षित मानतात. परंतु, हा सोडा देखील शरीरासाठी तितकाच घातक आहे.

डाएट सोड्यामध्ये झिरो कॅलरी आणि साखर असल्याचं सांगत तो सर्रास बाजारात विकला जातो. मात्र, त्यात वापरण्यात येणारं कृत्रिम स्वीटनर हे साखरेपेक्षा घातक आहे.

डाएट सोडातील कॅफीन आणि प्रिझर्व्हेटिव्ह मेंदूवर नकारात्मक परिणाम करू शकतात.त्यामुळे हार्मोनल इम्बॅलेन्सदेखील होऊ शकतो.

डाएट सोडा नियमित प्यायल्यामुळे न्यूरल अॅक्टिव्हिटीमध्ये बदल होतो. तसंच मज्जासंस्थेवरही ताण येतो.

या बदलांमुळे मनःस्थिती सतत बदलणे किंवा चिडचिडेपणा आणि अस्वस्थता देखील वाढू शकतं.

दिर्घकाळ डाएट सोडा प्यायल्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते.

केसातील कोंड्याने त्रस्त झालात? करुन बघा हे घरगुती उपाय

Click Here