सणासुदीला दाराला तोरणच का बांधतात? तर..

सणाला, शुभ कार्य असेल तेव्हा दाराला ताेरण लावले जाते. पण, नेहमीच दाराला ताेरण लावल्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

घरात चांगले, सकारात्मक वातावरण राहावे, म्हणून अनेक गाेष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत. 

घरात प्रवेश करताे, त्या दारावर म्हणजे मेन डाेअरवर ताेरण लावल्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे काेणते ते पाहूया.

दारावर ताेरण लावले की फक्त घराचे साैंदर्य वाढत नाही. तर, त्यामागे काही धार्मिक कारण ही आहेत. 

ताेरण हे पावित्र्याचे प्रतिक मानले जाते. मेन डाेअरला ताेरण लावल्यास घरात सकारात्मक उर्जा राहते. 

दारावर ताेरण असेल तर कुटुंबात सुख - समृद्धी येते, असे मानले जाते. घरात वातावरण आनंदी राहाते. 

ताेरणामध्ये आंब्याची पान लावलेली असतात. ती शुभ मानतात. यामुळे घरातली नकारात्मकता कमी हाेते. 

शुभ कार्याच्या वेळी पाना, फुलांचे ताेरण लावतात. पण, ही पानं, फुलं सुखल्यावर ताेरण काढून टाकायला विसरू नका.

काेमेजलेली फुलं, सुकलेल्या पानाचे ताेरण चांगले दिसत नाही. यामुळे घरात प्रवेश करताना उत्साही वाटत नाही. 

Click Here