पेरु खाल्ल्यानंतर 'या' पदार्थांचं करु नका सेवन, ठरेल घातक

पेरु खाण्याविषयीचे नियम काय आहेत ते आज पाहुयात.

सध्या बाजारात पेरु मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. पेरु खाण्याचे काही शारीरिक फायदे सुद्धा आहेत.

पेरु खाण्याचे फायदे आणि तोटे जवळपास सगळ्यांनाच ठावूक आहेत. परंतु, पेरु खाण्याविषयीचे नियम काय आहेत ते आज पाहुयात.

पेरु खाल्ल्यानंतर कोणत्या पदार्थांचं सेवन करणं वर्ज्य करावं ते समजून घेऊयात. कारण, या पदार्थांमुळे तुम्हाला शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

पेरूमध्ये व्हिटॅमिन C चं प्रमाण जास्त असतं. पेरु खाल्ल्यानंतर कधीही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत.

पेरु खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये यामुळे वात, कफ आणि पित्त या प्रकृती बिघडू शकतात. 

पेरुवर पाणी प्यायल्यामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो.

पेरू खाल्ल्यानंतर केळी खाणे टाळावे, कारण यामुळे पचनावर परिणाम होऊ शकतो. पोटदुखी, गॅस किंवा अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

पेरुसोबत किंवा पेरू खाल्ल्यानंतर दही खाल्लं तर उलटी होऊ शकते.

Menstrual Cup वापरतांना 'या' गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

Click Here