पितृ ऋणातून मुक्ती देणारी इंदिरा एकादशी १७ सप्टेंबर रोजी आहे. त्यादिवशी श्राद्धविधी कराच शिवाय राशीनुसार दान करा, लाभच होईल.
मेष राशीच्या लोकांनी इंदिरा एकादशीच्या पूजेनंतर गहू आणि नाचणी दान करावी.
वृषभ राशीच्या लोकांनी इंदिरा एकादशीच्या पूजेनंतर तांदूळ आणि पीठ दान करावे.
मिथुन राशीच्या लोकांनी इंदिरा एकादशीच्या पूजेनंतर गाईला हिरवा चारा खाऊ घालावा.
कर्क राशीच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी पूजेनंतर पांढरे कपडे दान करावे.
सिंह राशीच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी शेंगदाणे आणि गूळ दान करावे.
कन्या राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी विवाहित महिलांना हिरव्या बांगड्या दान कराव्यात.
तूळ राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी दही, पोहे, साखर आणि पांढरी मिठाई दान करावी.
वृश्चिक राशीच्या लोकांनी इंदिरा एकादशीच्या पूजेनंतर सफरचंद, मध आणि गहू दान करावे.
धनु राशीच्या लोकांनी एकादशीच्या पूजेनंतर हरभरा डाळ, हळद आणि मका दान करावा.
मकर राशीच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी बूट, चप्पल आणि ब्लँकेट दान करावे.
कुंभ राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी काळे कपडे, काळे तीळ आणि मोहरीचे तेल दान करावे.