कुत्रा चावल्याने मानसिक आजारांचा धोका

कुत्रा चावल्यानंतर मानसिक आजारांचा धोका आहे, ज्याकडे फार कोणी लक्ष देत नाही.

अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांबद्दलच्या ११ ऑगस्टच्या सूचनांमध्ये बदल केला आहे.

आता आक्रमक नसलेले, निर्जंतुकीकरण केलेले आणि लसीकरण केलेले कुत्रे ज्या भागातून पकडले गेले होते, त्याच भागात पुन्हा सोडता येतील.

पण मानसिक आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, या निर्णयात मानसिक आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

कुत्रा चावला तर पहिली भीती रेबीजची असते. यासोबतच अनेक मानसिक आजारांचा धोकाही वाढतो.

मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कुत्रा चावल्यानंतर लोक अनेकदा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) सारख्या गंभीर मानसिक आजारांना बळी पडतात.

Cynophobia- मुलांच्या मनात कुत्र्याची भीती बसते. ही भीती भयानक स्वप्नांप्रमाणे असते. मुलांना शाळेत जाताना किंवा घराबाहेर पडतानाही याची भीती वाटते.

Anxiety आणि Dipression- प्रौढांमध्ये चिंता वाढू लागते. यासोबतच नैराश्य सुरू होते आणि लोक सामाजिकदृष्ट्या एकटे पडू लागतात. 

Trauma- कधीकधी हा मानसिक आघात आणखी खोल स्वरूपात येतो. ही परिस्थिती रुग्ण आणि त्याच्या कुटुंबासाठी तणावपूर्ण बनते.

Click Here