भटक्या कुत्र्यांनी हल्ला करतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला
रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ले हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. अनेक घटनांमध्ये लहान मुलांचे बळी गेले आहेत.
भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकलीवर हल्ला केल्याची अशीच एक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना कर्नाटकातील आहे.
एक मुलगी रस्त्याने चालत येते. तिच्यावर दोन भटकी कुत्री हल्ला करतात. एक कुत्रा तिला पाठीमागून चावतो.
एक कुत्रा मुलीला आधी चावतो. नंतर तिला फरफट नेतो. नंतर तिच्या पायाला चावतो. दोन्ही कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर चिमुकली आरडाओरड करते.
दोन्ही भटक्या कुत्र्यांना प्रतिकार करताना चिमुकली खाली पडते. ती लाथ मारून कुत्र्याला पळवून लावण्याचा प्रयत्न करते.
चिमुकलीच्या आवाजाने आणि प्रतिकाराने दोन्ही कुत्रे पळून जातात. हा व्हिडीओ बघताना अंगावर अक्षरशः काटा येतो.
दोन्ही कुत्र्यांनी हल्ला केल्याची ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पहा हल्ल्याचा व्हिडीओ.
वेबस्टोरी बघण्यासाठी क्लिक करा