तुमची गुंतवणूक नीट वाढत आहे की नाही, याचे मूल्यमापन वेळोवेळी करणे गरजेचे आहे.
प्रत्येक जण गुंतवणूक पैसे वाढवण्याच्या हेतूने करीत असतो. ही गुंतवणूक नीट वाढत आहे की नाही, याचे मूल्यमापन वेळोवेळी करणे गरजेचे आहे.
संपूर्ण पोर्टफोलियोमधून किती परतावा मिळाला हे तपासण्यासाठी गुंतवणुकीचा संपूर्ण माहिती म्हणजे एकत्रितपणे गोळा करावी.
त्यात शेअर्स, म्युच्युअल फंड, खरेदीची तारीख आणि रक्कम आदी तपशील एकत्र करावा. यामुळे पोर्टफोलियाच्या परताव्याची बाजाराच्या निर्देशांकांशी तुलना करणे शक्य होते.
दुप्पट पैसे मिळाले तर हे चांगलेच दिसते; पण जर निर्देशांकाने त्याच कालावधीत म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाढ केली असेल तर त्या तुलनेत तुमचा परतावा कमी आहे लक्षात घ्या.
तुमच्या पोर्टफोलियोमध्ये काही भाग तुम्ही एफडीमध्ये आणि काही भाग म्युच्युअल फंडात गुंतविला असेल तर दोन्हींच्या एकत्रित परताव्याची निर्देशांकांशी तुलना करा.
कधी कधी एखाद्या वर्षी भरपूर परतावा मिळाला, पुढच्या वर्षी यात घट झाली नंतर पुन्हा परतावा वाढला तर याचाही अभ्यास करा. पोर्टफोलिओत त्यानुसार बदल करावे लागतील, हे लक्षात घ्या.