ग्रहण काळात प्राणी वेगळे का वागतात?

ग्रहण म्हणजे सूर्य किंवा चंद्र झाकला जाणं. अशा वेळी प्राणी अचानक वेगळं वागू लागतात. पण असं का? प्राणी का वेगळे वागतात?

सूर्य ग्रहण सुरू झाल्यावर पक्षी अचानक शांत एका ठिकाणी बसतात किंवा घरट्याकडे परततात. त्यांना वाटतं अंधार पडला म्हणजे रात्र झाली.

बेडूक, झुरळ, कीटक आवाज काढायला लागतात. कारण त्यांचा 'नाईट मोड' सक्रिय होतो.

हत्ती आणि अन्य मोठे प्राणी कधी कधी बेचैन होतात. अचानक झालेल्या अंधारामुळे त्यांचा गोंधळ उडताे.

पाळीव कुत्रे, मांजरीसुद्धा विचित्र वागतात. ते मालकाला चिकटून बसतात किंवा घाबरतात.

शास्त्र सांगत, प्राण्यांचा 'सर्केडियन रिदम' म्हणजे जैविक घड्याळ सूर्यप्रकाशावर अवलंबून असतो.

ग्रहणात अचानक प्रकाश कमी झाल्यावर त्यांचं घड्याळ गोंधळतं. त्यांना दिवस-रात्री यातला फरक कळत नाही.

वटवाघुळे उडायला लागतात. त्यांना वाटतं आता खरंच रात्र झाली आहे.

काही संशोधने सांगतात, ग्रहणात बदललेला प्रकाश व वातावरण प्राण्यांच्या मेंदूच्या हार्मोन्सवर परिणाम करतो.

Click Here