जगाच्या पाठीवर एक देश असा आहे, जिथे शेत जमीनच नाही.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती ही आपल्या देशाची ओळख आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेत याचा मोठा वाटा आहे.
जर, देशातील शेतकऱ्यांनी अन्न उत्पादन थांबवले तर, इतक्या मोठ्या लोकसंख्येचे पोट भरणे कठीण होईल.
पण एक देश असा आहे, जिथे शेत जमीनच नाही. हा देश सिंगापूर आहे. या देशात शेतीची जागा कारखान्यांनी घेतली आहे.
मात्र, एक काळ असा होता, जेव्हा सिंगापूरमध्ये शेती आणि पशुपालन एकत्र केले जात होते. भरपूर धान्य पिकवले जात होते.
मात्र, १९७०नंतर सिंगापूरने आपल्या आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि शेती जमिनीवर कारखाने उभारले.
आजकाल सिंगापूरची लोकसंख्या इतकी वाढली आहे की, धान्य पिकवण्यासाठी जागाच उरलेली नाही.
जागेअभावी सिंगापूरमधील शेती बंद झाली. आता हा देश अन्न-धान्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे.
कोरोना दरम्यान जेव्हा अनेक देशांनी त्यांच्या सीमा बंद केल्या, तेव्हा सिंगापूरमध्ये धान्याची टंचाई निर्माण झाली होती.
धान्य संकटाचा धोका गांभीर्याने घेत, सिंगापूरने २०३० पर्यंत आपल्या एकूण गरजेच्या ३० टक्के वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सिंगापूरमध्ये, धान्य आणि भाज्यांसाठी 'वर्टीकल फार्मिंग'चा वापर केला जात आहे, ज्यात बहुमजली इमारतींमध्ये पीक घेतले जाते.