कमळाच्या मुळांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
कमळाच्या मुळांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कमळाच्या मुळांना Lotus Stem म्हणतात. तसेच 'द सीक्रेट लोटस' म्हणूनही ओळखले जाते.
कमळाच्या मुळांमध्ये यात फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स (विशेषतः व्हिटॅमिन B6, C), आणि खनिजे जसे की पोटॅशिअम, फॉस्फरस, तांबे, लोह, मॅगनीज असतात.
पचन सुधारते : फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता दूर होते.
एनीमिया कमी करते : यात असलेले लोह रक्तात लाल रक्त पेशी तयार करण्यात मदत करते, ज्यामुळे एनीमिया होण्याचा धोका कमी होतो.
ब्लड प्रेशर नियंत्रणात : पोटॅशिअम रक्तप्रवाह सुधारतो, रक्तवाहिन्यांना आराम देतो आणि हृदयावर ताण कमी करतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक क्षमता बळकट होते.
मूड सुधारते : व्हिटॅमिन B मध्ये असलेले तत्त्व तणाव, चिडचिडपणा आणि डोकेदुखी नियंत्रणात ठेवतात.
वजन कमी करण्यास उपयुक्त : कमी कॅलोरी आणि फायबरमुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते, चयापचय सुधारतो.
बद्धकोष्ठतेत आराम : आतड्यांतील गॅस्ट्रिक ज्यूसचे प्रमाण वाढवून मलनिस्सारणात मदत होते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर : कोलेजन उत्पादन वाढवून त्वचेला तरतरी आणि चमकदारपणा देते, तसेच केस मजबूत होण्यास मदत करते.