पावसाचं पाणी पिण्यायोग्य असतं का? 

पावसाचे पाणी दिसायला स्वच्छ असले, तरी ते पिण्यास योग्य असते का? जाणून घेऊया... 

पावसाचं पाणी दिसायला अगदी स्वच्छ असतं. ते थेट पिऊ शकतो असं अनेकांना वाटत असतं. 

डिस्टिल्ड पाणी हे सगळ्यात स्वच्छ पाणी असतं, कारण ते वाफेपासून तयार केलं जातं. पावसाचं पाणी यात मोडतं का?

असं म्हटलं जातं की, पावसाचं पाणी डिस्टिल्ड पाण्याप्रमाणे जमीनवरून वाफ होऊन, ढगांतून खाली येतं, म्हणून ते देखील स्वच्छ आहे. 

पण, डिस्टिल्ड पाणी हे कधीही मोकळ्या जागेत तयार केले जात नाही. या उलट पावसाचे पाणी हे मोकळ्या वातावरणात खाली जमिनीवर पडते. 

ढगातून हे पाणी जमिनीवर पडत असताना त्यात अनेक अशुद्धी मिसळल्या जातात. त्यामुळे हे पाणी शुद्ध राहत नाही. 

पावसाचे पाणी स्वच्छ दिसते म्हणून ते पिण्यायोग्य आहे असे नाही. चाचणी केल्यानंतरच पाण्याची शुद्धता कळू शकते.

पहिल्या पावसाच्या पाण्यात अनेक अशुद्धी आणि जीवजंतू असतात, त्यामुळे पहिल्या पावसात न भिजण्याचा सल्ला दिला जातो.

पावसाचे पाणी थेट तसेच प्यायल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते.

Click Here