तुमच्या स्मार्टफोनचा मायक्रोफोन किंवा व्हॉइस असिस्टंट तुमचं बोलणं ऐकतंय का...?
तुमच्या स्मार्टफोनचा मायक्रोफोन किंवा व्हॉइस असिस्टंट तुमचं बोलणं ऐकू नये यासाठी काही सेटिंग्ज बदलाव्यात लागतील.
Settings मध्ये जा. Google वर क्लिक करा. Search, Assistant & Voice या पर्यायात जा. Google Assistant वर क्लिक करा.
“Hey Google” किंवा “Voice Match” हे फिचर बंद करा. यामुळे मायक्रोफोन सतत ऍक्टिव्ह राहणार नाही आणि तुमचे संभाषण रेकॉर्ड होणार नाही.
मायक्रोफोन परमिशन तपासा व बंद करा. Settings मध्ये जा. Apps किंवा Applications वर क्लिक करा. Permissions वर जा. Microphone वर क्लिक करा.
गरज नसलेल्या अॅप्सकडून मायक्रोफोनची परमिशन रद्द करा (Don’t Allow/Reject/Remove Permission). यामुळे त्या अॅप्सना तुमचे संभाषण ऐकू येणार नाही.
काही फोनमध्ये "Always Listening" किंवा "Voice Wake Up" अशी सेटिंग असते. ते देखील बंद करावं लागले.
यासाठी Settings → Privacy/Accessibility मध्ये जा. तिथे “Always Listening” किंवा “Voice Wake Up” पर्याय बंद करा.
याचबरोबर Talkback/Accessibility Voice बंद करा Settings मध्ये जाऊन Accessibility मध्ये Talkback Feature शोधा आणि ते ऑफ करा
काही वेळेस, Volume Up + Volume Down बटन एकत्र 3-5 सेकंद दाबल्यानेही Talkback बंद करता येतो.