जाणून घ्या ९० दिवसात फॅटी लिव्हर रिव्हर्स करण्याचे फंडे

मॉडर्न लाईफ स्टाईलमुळे फॅटी लिव्हर ही एक मोठी समस्या झाली आहे. 

मॉडर्न लाईफ स्टाईलमुळे फॅटी लिव्हर ही एक मोठी समस्या झाली आहे. फॅटी लिव्हर हे अनेक आजारांना निमंत्रण देते. मात्र फॅटी लिव्हर रिव्हर्स करता येते. 

साखर थेट यकृतात चरबी म्हणून साठवली जाते, त्यामुळे पॅकेज्ड ज्यूस, फ्लेवर्ड योगर्ट, एनर्जी बार्स, आणि "हेल्दी" सिरप यांचे सेवन टाळा. फायबरयुक्त फळाचे सेवन कारा.

फायबर केवळ पचनासाठी नाही, तर इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते, जळजळ कमी करते. जिंक, फ्लॅक्ससीड्स, चणाडाळ, मसूर, ब्रोकोली यांसारखी क्रुसीफेरस यकृतासाठी चांगल्या असतात.

ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स दाह कमी करतात. फॅटी फिश, फ्लॅक्ससीड ऑइल, अक्रोड हे याचा उत्तम स्त्रोत आहेत.  प्रोसेस्ड ऑइलमध्ये ओमेगा-६ जास्तप्रमाणात असतं त्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे.

अँटिऑक्सिडंट जसे की बेरी, ऑलिव्ह तेल, माचा, डाळिंब, हळद यकृतातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात आणि इन्सुलिन रेसिस्टन्स सुधारतात.

नीट झोप न झाल्यास यकृतात चरबी साठते व फॅटी लिव्हर वाढतो. नियमित, पुरेशी झोप आवश्यक आहे.

उशिरा जेवण केल्याने यकृताचे रिपेअरिंग थांबते व चरबी जास्त साठते. झोपण्याच्या २–३ तास आधी जेवण पूर्ण करा.

लो-फॅट किंवा "डाएट" पॅकेज्ड पदार्थांमध्ये रिफाइंड कार्ब्स, ट्रान्स फॅट्स आणि अॅडिटीव्ह्स असतात; हे यकृतासाठी घातक आहेत. पॅकेज्ड स्नॅक्सऐवजी नट्स, उकडलेले चणे किंवा ताज्या फळांचे सेवन करा.

फॅटी लिव्हरवर वेळेत उपचार न केल्यास फिब्रोसिस, सिरोसिस यांसारख्या गंभीर अवस्थांना सामोरे जावे लागू शकते, ज्यात यकृत कायमचे निकामी होऊ शकते.

Click Here