पापण्यांची उघड झाप किती वेळा हाेते?

आपल्या कळत, नकळतपणे शरीर काहीवेळा प्रतिक्रिया देत असतं. पापण्यांची उघड झाप आपल्या नकळतपणे हाेते. किती वेळा हाेते माहिती आहे का?

डोळे हे अतिसंवेदनशील अवयव आहे. डाेळ्यांच्या रक्षणासाठी ब्लिंक रिफ्लेक्स म्हणजे पापणी लवणे ही सर्वात वेगवान प्रतिक्रिया असते.

ब्लिंक रिफ्लेक्स फक्त १०० ते १५० मिलिसेकंदात होतो. म्हणजे डोळ्याजवळ काही आलं की आपण पापण्या लवतात, नकळत पण तरीही झपाट्याने.

अगदी नवजात बाळांमध्येही ब्लिंक रिफ्लेक्स दिसतो. कारण हा जन्मजात संरक्षण यंत्रणा आहे.

हा रिफ्लेक्स आपल्या मेंदूच्या ब्रेनस्टेम भागातून नियंत्रित होतो. डोळ्यापर्यंत पोहोचणाऱ्या धोक्याचा सिग्नल त्याला लगेच मिळतो.

धुळकण, कीटक, प्रकाशाची तीव्रता किंवा अचानक हालचाल असं काहीही असलं तरी डोळ्यांना धोका जाणवल्यास पापण्या लगेच मिटतात.

या क्षणार्धातल्या हालचालीमुळे डोळ्यांचं कॉर्निया सुरक्षित राहताे. ही नैसर्गिक सुरक्षा कवचासारखी प्रक्रिया आहे.

सामान्य माणसाच्या एका मिनिटाला १५ - २० वेळा पापण्यांची उघड झाप करताे. म्हणजे दिवसाला साधारण १४ - १५ हजार वेळा ही क्रिया घडते. 

ब्लिंक रिफ्लेक्स हा शरीरातील फास्टेस्ट मसल मूव्हमेंट्स मध्ये गणला जातो. तो आपल्या टिकून राहण्याच्या क्षमतेशी थेट जोडलेला आहे.

पापण्यांच्या उघड झाप झाल्यामुळे डोळ्यांवर अश्रूंचा पातळ थर पसरतो. तो डोळ्यांना कोरडे पडू देत नाही.

Click Here