फुकट मिळणाऱ्या गोष्टीचे मोल त्या मिळणे बंद होईपर्यंत कळत नाही, श्वासाबाबत तेच घडते; वर्षभरात आपण किती वेळा श्वास घेतो माहितीय?
सध्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार वाढले आहेत. त्यामुळे कोव्हीड नंतरही प्रदूषणामुळे लोक मास्क वापरत आहेत. या गोष्टींचा श्वसनावर परिणाम होत आहे.
पण तुम्हाला माहितीय का? आपण एका क्षणात, एका दिवसात, एका महिन्यात आणि एका वर्षात किती वेळा श्वास घेतो ते?
रेस्टिंग रेस्पिरेटरी रेटनुसार मध्यमवयीन निरोगी व्यक्ती एका मिनिटात साधारण १२-२० वेळा श्वास घेते.
लहान मुलांचे मेटाबॉलिझ्म जास्त असल्याने ती एका मिनिटात २०-३० वेळा श्वास घेतात.
तान्ह्या बाळाचं हृदय तर अतिशय वेगाने धडकते, त्यामुळे ती एका मिनिटात ३०-६० वेळा श्वास घेतात.
या हिशोबाने पाहता सामान्य मध्यमवयीन व्यक्ती १२x६०x२४ प्रमाणे २३०४० वेळा दिवसभरात श्वास घेते.
आणि वर्षाचा हिशोब लावला तर २३०४०x ३६५=८४०९६०० वेळा आपण श्वास घेतो.
सदर माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित असून ती व्यक्तिपरत्त्वे वेगवेगळी असू शकते.