या वनस्पतीच्या पानांचा ओव्यासारखा वास येतो. या वासावरून या रानभाजीचे नाव 'पानांचा ओवा' असे पडले आहे.
या वनस्पतीची लागवड परसबागेत व कुंडीत ही करता येते. ह्या वनस्पतीची अभिवृद्धी तिच्या फांदीपासून केली जाते. तुम्ही ह्याची फांदीही कुंडीत लावू शकता.
पिण्याच्या पाण्याला सुवासिक वास येण्यासाठी तसेच औषधामध्ये हिच्या पानांचा वापर केला जातो.
मानवी जीवनाप्रमाणे जनावरांसाठी औषध म्हणूनही वापरतात.
पोटदुखी, अपचन, पोटशूळ यामध्ये एखादे पान दिल्यास गुणकारी ठरते.
दमा, जुनाट खोकला यामध्ये पानांचा ओवा प्रभावी ठरतो. याची भाजीही केली जाते.