केळीचे साल फेकून देताय... थांबा हे आहेत त्याचे १० उत्तम उपयोग

केळीच्या साली आपण बहुतेक वेळा टाकून देतो, पण त्या अत्यंत उपयोगी असतात. 

केळीच्या साली आपण बहुतेक वेळा टाकून देतो, पण त्या पोषक तत्त्वांनी भरलेल्या आणि अत्यंत उपयोगी असतात. खाली दिलेले १० प्रभावी उपयोग पाहूया 

केळीच्या सालींमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. साली थेट मातीमध्ये गाडल्यास किंवा पाण्यात भिजवून झाडांना घातल्यास उत्तम खत मिळते.

सालाच्या आतील बाजूने चांदीची भांडी किंवा लेदरच्या वस्तूंवर हलक्या हाताने घासा, नंतर मऊ कापडाने पुसून घ्या — त्यामुळे त्यांना नैसर्गिक चमक मिळेल.

सालींच्या आतील भागाने दातांवर हलकेसे चोळा. त्यातील खनिजे दात हलकेसे क्लीन करतात त्यामुळं ते पांढरे दिसण्यास मदत होते.

केळीच्या सालांमध्ये antioxidants आणि सूज कमी करणारे घटक असतात. हलक्या हाताने साल त्वचेवर चोळल्यास मुरुम, सूज किंवा लालसरपणा कमी होतो.

काटा लागलेली जागा सालाने झाकल्यास त्यातील एन्झाईम त्वचा मऊ करतात व काटा काढणे सोपे होते.

केळाच्या सालीचे छोटे तुकडे करून बरणीत ठेवा. त्यामुळे माशा व इतर लहान कीटक आकर्षित होऊन अडकतात.

केळीच्या साली पाण्यात वाटून केसांना लावा. त्यातील जीवनसत्त्वे B6 आणि C केसांना मऊपणा व चमक देतात.

नीट धुऊन आणि शिजवून केळीच्या साली स्मूदी, भाजी किंवा स्टर-फ्रायमध्ये वापरता येतात. त्यामुळे फायबर आणि पोषकतत्त्वे वाढवतात.

केळीच्या साली बूट चकचकीत करण्यास देखील वापरू शकता. सालाने पुसून नंतर मऊ कापडाने घासल्यास बूट चमकतील.

Click Here