डिजिटल ऑफर्स आणि बचतीचा फंडा

पैसे येतात पण खर्चच हाेऊन जातात. सेव्हिंग्स हाेत नाही. खर्चाच गणित जमतं नाहीये, तर सेव्हिंग्सच्या या काही ट्रिक्स.

आठवड्याचं बजेट तयार करा. किती पैसे येतात आणि कुठे कुठे खर्च हाेतात हे लिहून ठेवा म्हणजे तुमचा खर्चाचा हिशाेब लागेल. 

हाॅटेलिंग किंवा बाहेरून मागवून खाण्यात पैसे खर्च हाेतं असतील तर आता हे कमी करा. घरच्या घरीच वेगवेगळे पदार्थ करा. 

ऑनलाईन खरेदी करताना ऑफर्स, डिस्काउंट कूपन्स आहेत का, ते चेक करा. यामुळे ती वस्तू तुम्हाला कमी किंमतीत मिळेल, तुमचे पैसे वाचतील. 

प्रत्येकवेळी ब्रँडेड वस्तूच घेण्याची गरज नाही. त्याला जेनरिक पर्याय उपलब्ध असल्यास त्याची निवड करा. त्या वस्तूसाठी कमी किंमत माेजावी लागेल. 

सेव्हिंगसाठी दरमहा ठरलेली रक्कम तुमच्या खात्यातून ऑटोमॅटिक जाईल असे सेटिंग ठेवा. तुम्ही विसरलात तरी खात्यातून रक्कम सेव्हिंगला जाईल. 

महागड्या महत्त्वांच्या वस्तूंची खरेदी करायची असल्यास सीझन सेल्स असतात. या सेल्समध्ये कमी किंमतीत वस्तू मिळते. त्यावेळी वस्तूंची खरेदी करा. 

काही ऍपची सबस्क्रिब्शन्स घेतली असतील, त्या ऍप उपयाेग तुम्ही करत नसाल. मेंबरशीप घेतल्या असतील, त्या रद्द करून टाका. 

Click Here