चेहऱ्यावर पिंपल्स येण्यामागे 'हे' 5 व्हिटामिन्स आहेत कारणीभूत
शरीरात 'या' 5 व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर येतात वारंवार पिंपल्स
आजच्या काळात अनेक टीनएजर्स चेहऱ्यावर पिंपल्स येण्याच्या समस्येने त्रस्त आहेत.
अनेक वैद्यकीय उपाय, क्रिम्स लावूनही हे पिंपल्स काही केल्या कमी होत नाहीत. परंतु, चेहऱ्यावर पिंपल येण्यामागे काही व्हिटामिन्सही कारणीभूत आहेत.
तुमच्या शरीरात काही ठराविक व्हिटामिन्सची कमतरता असेल तर तुम्ही कितीही उपाय केले तरी चेहऱ्यावर फोड हे येणारचं. त्यामुळे शरीरातील या व्हिटामिन्सची कमतरता आधी दूर करा.
त्वचेसाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचं आहे. जर हे व्हिटामिन शरीरात कमी असेल तर त्वचा रुक्ष होऊन चेहऱ्यावर फोड येऊ शकतात.
व्हिटामिन डी च्या कमतरतेमुळे सुद्धा पिंपल्स आणि अन्य स्कीन प्रॉब्लेम होऊ शकतात.
व्हिटामिन ई हे एक अँटीऑक्सिडेंट असून त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात.
व्हिटामिन बी2 आणि व्हिटामिन बी6 जर शरीरात कमी असेल तरीदेखील स्कीन प्रॉब्लेम होऊ शकतो.
झिंक हे एक खनिज असून स्कीन हेल्दी ठेवण्यास मदत मिळते. परंतु, जर ते शरीरात कमी असेल तर चेहऱ्यावर सूज येणे, पिंपल्स येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.
स्वयंपाक घरातल्या भांड्यांनाही असते एक्स्पायरी डेट