अनेक गृहिणी रात्रीच कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवतात.
सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत कणिक मळायला खूप वेळ लागतो. या कारणामुळे अनेक गृहिणी रात्रीच कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवतात.
रात्रभर भिजवून ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या करणं कितीही सोपं वाटत असलं तरीदेखील ते शरीरासाठी तितकंच घातक आहे.
कणिक रात्रभर भिजवून ठेवल्यामुळे ती काळी पडू लागते. यामुळे पोळीच्या चवीत फरक पडतो.
रात्रभर कणिक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याच्यातील आर्द्रता कमी होते. परिणामी, कणिक कडक होऊन पोळ्या वातट होतात.
फ्रीजमध्ये कणिक ठेवल्यामुळे त्यातील पोषकमूल्य नष्ट होतात. तसंच पोटीदुखीसारख्या समस्या निर्माण होतात.