सर्दी झाल्यावर स्टीम घेताय? Steam घेण्याचे आहेत साईड इफेक्ट्स
स्टीम घेण्याचे जसे फायदे आहेत. तसेच काही तोटे सुद्धा आहेत .
सर्दी-खोकला झाला तर अनेक जण कफ पातळ होण्यासाठी गरम पाण्याच्या वाफेचा आधार घेतात. काही जण नेब्युलाझरदेखील वापरतात.
स्टीम घेण्याचे जसे फायदे आहेत. तसेच काही तोटे सुद्धा आहेत म्हणूनच, स्टीम घेण्याचे तोटे कोणते ते पाहुयात.
सर्दीमुळे नाक बंद झालं तर श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे सर्रास स्टीम घेतली जाते. परंतु, 'जर्नल ऑफ रेस्पिरेटरी मेडिसिन' मध्ये २०२५ मध्ये पब्लिश झालेल्या रिसर्चनुसार, वारंवार स्टीम घेणं घातक आहे.
वारंवार स्टीम घेतल्यामुळे नाकातील नाजूक त्वचा आणि म्यूकस मेम्ब्रेन यांच्यावर परिणाम होऊ शकतो.
वारंवार स्टीम घेणाऱ्या लोकांच्या नाकात जळजळ होणे, कोरडेपणा अशा समस्या कालांतराने निर्माण होतात.
दिल्लीच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अजय गुप्तांच्या मते, गरम पाण्याच्या वाफेमुळे नाकातील पातळ स्कीन जळते. ज्यामुळे काही वेळा नाकातून रक्त सुद्धा येऊ शकतं.
गरम पाण्याच्या वाफेमुळे चेहऱ्यावरील स्कीनदेखील डॅमेज होते.
अगदीच गरज वाटली तरच स्टीम घ्या. किरकोळ त्रास झाल्यास स्टीम घेणं टाळा. त्याऐवजी सलाइन ड्रॉप्सचा वापर करा. किंवा, मीठ घालून गरम पाण्याच्या गुळण्या करा.