फराळासाठी एकच तेल वारंवार वापरताय? आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
एकाच तेलात फराळ तळल्यामुळे आरोग्यावर होतील दुष्परिणाम
एखादा पदार्थ तळल्यानंतर शिल्लक तेल वाया जाऊ नये यासाठी काही गृहिणी त्यातच तेलाचा पुन्हा वापर करतात.
एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा दुसरा पदार्थ तळण्यासाठी करु नये असं अनेकदा सांगण्यात येतं. त्यामागे काही कारणं आहेत. ही कारणं कोणती ते पाहुयात.
एकच तेल वारंवार वापरल्यामुळे त्यात फ्री रॅडीकल्स तयार होतात. ज्यामुळे शरीरावर त्याचा विपरित परिणाम होतो.
एकच तेल पुन्हा पुन्हा तळण्यासाठी वापरलं तर त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. यात पोटाचा कॅन्सर, पित्ताशयाचा कॅन्सर किंवा यकृताचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर केल्याने हृदयविकाराची समस्याही उद्भवू शकते. एकदा वापरलेल्या तेलाच्या पुनर्वापरामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर केल्यास पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. अल्सर, ॲसिडिटी, जळजळ असे अनेक त्रास होण्याची शक्यता असते.
त्याचबरोबर तेलाच्या पुनर्वापरामुळे पचनासही त्रास होतो. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाब यांसारख्या समस्याही उद्भवतात.