काही असे पदार्थ आहेत जे स्टीलच्या भांड्यात ठेवल्यास त्यांची गुणवत्ता खालावते.
आज घराघरात स्टीलची भांडी पाहायला मिळतात. ही भांडी वापरायला जितकी छान वाटतात. तितकीच ती शरीरासाठी घातकदेखील आहेत.
काही असे पदार्थ आहेत जे स्टीलच्या भांड्यात ठेवल्यास त्यांची गुणवत्ता खालावते. ते पदार्थ कोणते पाहुयात.
दही शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, स्टीलच्या भांड्यात ठेवल्यामुळे त्याची गुणवत्ता खालावते आणि दही खराब होण्याची शक्यता असते.
घराघरात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे लोणचं. परंतु, स्टीलच्या भांड्यात लोणचं ठेवल्यास ते काळं पडण्याची शक्यता असते.
स्टीलच्या डब्यात फळे किंवा सॅलड अजिबात ठेऊ नये. कारण, यामुळे फळांना पाणी सुटते व त्यांची चव बदलते.
ज्या पदार्थांमध्ये लिंबाचा वापर केला आहे. ते पदार्थ कधीच स्टीलच्या भांड्यात ठेऊ नये. कारण, या पदार्थांची तीव्रता कमी होते.
टोमॅटोदेखील स्टीलच्या भांड्यात ठेऊ नये. स्टीलच्या भांड्यात टोमॅटो किंवा त्यापासून तयार केलेले पदार्थ ठेवल्यास पदार्थामधील पोषकतत्व कमी होतात.