आजकाल जवळजवळ सर्व घरांमध्ये फ्रिज असतोच असतो. त्यामुळे सर्रासपणे आपण कोणतेही पदार्थ त्याच्यात ठेवतो. मात्र, फ्रीजमध्ये कोणते पदार्थ ठेऊ नयेत हे पाहुयात.
कोणत्याही फळांचा ज्यूस खूप काळ फ्रिजमध्ये ठेवू नये. जास्त काळ ज्यूस फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याच्यात रासायनिक प्रक्रिया होते व तो खराब होतो. परिणामी, फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ शकतो.
कच्चे मांस फ्रीजमध्ये ठेऊ नये. कारण त्याला खूप थंड तापमानाची आवश्यकता असते. आणि, आपल्या फ्रीजमध्ये त्याला तितका गारवा मिळत नाही. परिणामी, त्यात बॅक्टेरिया होण्याचा धोका वाढू शकतो.
केळी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. त्यामुळे त्या लवकर काळी पडतात तसेच त्याची चव खराब होऊ शकते.
जर तुम्ही दही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवत असाल तर तापमानातील बदलामुळे त्याची पोत बदलू शकते किंवा ते लवकर आंबट होऊ शकते. म्हणून, दही देखील रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये.
बहुतेक घरांमध्ये, बटर रेफ्रिजरेटरच्या दारात किंवा फ्रिजमध्ये ठेवल्याने ते लवकर खराब होते. तसेच ते सतत ठेवल्याने ते गोठते त्यामुळे त्याचा पोत आणि चवही बदलते.