ही ट्रीक वापरली तर डायफ्रूट्स राहतील बराच काळ फ्रेश
ड्रायफ्रूट्सची योग्य काळजी घेतली तर ते बराच काळ टिकतात.
दिवाळीमध्ये मिठाईसोबतच ड्रायफ्रूट्सचीदेखील खरेदी हमखास होते. परंतु, अनेकदा हे ड्रायफ्रूट्स लवकर खराब होतात.
ड्रायफ्रूट्स लवकर खराब होऊ नये आणि ते दीर्घकाळ टिकून रहावेत यासाठी काही टिप्स पाहुयात.
ड्रायफ्रूट्स साठवतांना योग्य काळजी घेतली तर साधारणपणे ते ३-४ महिने ते एकदम फ्रेश राहतील.
ड्रायफ्रूट्स कधीही ज्या बॉक्समध्ये आणले जातात त्या बॉक्समध्ये फार काळ ठेवायचे नाहीत. यामुळे ते कालांतराने त्यांच्या चवीत फरक पडतो. ते खवट लागायला लागतात.
मनुका स्टोर केल्यानंतर वरचेवर त्या डब्यात हलवत जा. नाही तर त्या एकमेकांना चिकटून बसतात आणि, मग त्यांची गुणवत्ता खालावते.
काजू आणि बदाम कायम वेगवेगळे स्टोर करा. कारण, काजूमध्ये कीड लवकर लागते.