पहिल्यांदा विमान प्रवास करत असाल तर करू नका या ५ चुका
विमानप्रवास करण्याची संधी मिळाल्यानंतर काही गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे.
आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करावा असं अनेकांचं स्वप्न असतं. यात काहींना हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते.
विमानप्रवास करण्याची संधी मिळाल्यानंतर काही गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे.
विमान प्रवास करण्यापूर्वी सामान नेण्याविषयीच्या नियमांची माहिती करुन घेणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे अतिरिक्त सामान झालं तर एअरपोर्टवर ऐनवेळी तुम्हाला सामान कमी करावं लागेल.
अनेकदा लोक चेक-इन वेळेवर करतात. परंतु, मुख्य गेटवर पोहोचण्यास लेट करतात. त्यामुळे त्यांची फ्लाइट मिस होते. त्यामुळे, फ्लाइट सुटायच्या २० मिनिटे आधी बॉर्डिंग गेटजवळ पोहोचणं गरजेचं आहे.
बऱ्याचदा प्रवास सुरु होण्यापूर्वी अचानक बोर्डिंग गेट चेंज केलं जातं. त्यामुळे बोर्डिंगच्या सुचनांकडे नीट लक्ष द्या. नाहीतर फ्लाइट दुसरीकडे लागायची आणि तुम्ही दुसऱ्या गेटवर वाट पाहात बसायचात.
प्रवास करण्यापूर्वी तुमची प्रकृती उत्तम असणं गरजेचं आहे. जर तुम्ही आजारी असाल तर एअरपोर्ट स्टाफ तुम्हाला प्रवास करण्यापासून रोखू शकतो.
प्रवास करतांना खासकरुन इंटरनॅशनल फ्लाइटमध्ये चुकूनही मद्यपान करु नका. यामुळे तुमचं बोर्डिंग थांबवलं जाऊ शकतं.
विमानतळावरील स्टाफसोबत वाद घालणं, प्रोटोकॉल मोडणं यामुळे सुद्धा तुमच्या प्रवासात मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
नातवंडांसमोर आजी-आजोबांनी पाळा 'हे' महत्त्वाचे नियम