कपड्यांवरील तेलाचा डाग होईल मिनिटात गायब, ही एक गोष्ट करेल मॅजिकसारखं काम

तेलाचे डाग कितीही प्रयत्न केले तरी पटकन जात नाहीत.

बऱ्याचदा जेवतांना किंवा स्वयंपाक करतांना कपड्यांवर तेलाचे डाग पडतात.

तेलाचा डाग इतका हट्टी असतो की कितीही प्रयत्न केले तरी तो जात नाही. 

आज अशा काही टिप्स पाहुयात. ज्यामुळे तेलाचे डाग सहज निघतील.

तेल लागलेल्या ठिकाणी बेकिंग सोडा आणि पाण्याची घट्ट पेस्ट करुन लावा. १५ मिनिटांनी ब्रशच्या सहाय्याने डाग लागलेल्या ठिकाणी घासा आणि पाण्याने धुवून घ्या.

तेलाचा डाग नुकताच पडला असेल तर त्यावर लगेचच कॉर्नस्टार्च किंवा टाल्कम पावडर टाका ज्यामुळे तेल शोषलं जाईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे डाग लागलेलं कापड धुवा.

तेलाचा डाग लागलेल्या ठिकाणी लिक्विड डिशवॉशर लावा आणि कोमट पाण्याने धुवून टाका.

परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी करा अशी तयारी, पेपर जाईल एकदम सोपा

Click Here