सणवार आले की प्रत्येकाच्या घरात गोडाधोडाच्या पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. यात अनेकदा बाजारात भेसळयुक्त मिठाईदेखील विक्रीसाठी ठेवलेली असते.
आपण बाजारातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई खरेदी करत असतो. परंतु, ही मिठाई भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्याच्या काही ट्रिक्स पाहुयात.
काजूकतली जास्त ब्राइट असेल किंवा तिच्यावर तेलकट अशी चमक असेल तर नक्कीच त्याच्यात भेसळ झाली आहे. यात मैदा आणि शेंगदाणाकूट मिक्स करुन भेसळ करण्यात आली आहे.
दिवाळीत खवा आणि मावा यांपासून केलेल्या मिठाई जास्त प्रमाणात विकल्या जातात. त्यामुळे त्यांच्यात भेसळ होण्याचं प्रमाण अधिक असतं.
मावा किंवा खव्याची मिठाई खरेदी करतांना ती बोटाने थोडीशी रगडा. जर हातावर तेल किंवा विचित्र वास आला तर त्यात भेसळ झाली आहे.
पनीर खरेदी केल्यानंतर ते पाण्यात ठेवा. जर पाण्याचा रंग धुसर पांढरट झाला किंवा पनीरचे तुकडे पडायला लागले. तर ते भेसळयुक्त पनीर आहे.
मिठाईवरील सिलव्हर वर्क जाळल्यानंतर त्यातून काळा धूर आला तर समजून जा तो चांदीचा वर्क भेसळयुक्त आहे.