यंदाच्या दिवाळीत ट्राय करा रॉयल लूक देणाऱ्या या ५ साड्या
दिवाळीत नक्की ट्राय करा या साड्या
सणवार आले की प्रत्येकाच्या घरात आनंदी आनंद असतो. यात दिवाळी म्हटलं ती आनंदाला काही तोटाच नाही.
दिवाळीमध्ये लहान-मोठे प्रत्येक जण नवीन कपड्यांची खरेदी करत असतात. परंतु, कपाटात कितीही साड्या असल्या तरी स्त्रियांना प्रश्न पडतो की नेमकी कोणती साडी नेसावी.
दिवाळीमध्ये तुम्ही नक्कीच बनारसी साडी ट्राय करु शकता. या साडीत तुम्हाला रॉयल लूक तर मिळतोच सोबतच एलिगेंट लूकही क्रिएट होतो. त्यामुळे यंदा ही साडी नक्की ट्राय करा.
तामिळनाडूची एक ओळख असलेली साडी म्हणजे कांजीवरम साडी. हेवी कापड आणि जरीवर्क मुळे ही साडी रीच लूक देते.
चंदेरी साडी तर सगळ्यांनाच ठावूक असेल मध्यप्रदेशच्या चंदेरी भागात खासकरुन तयार होणारी ही साडी दिवाळीसाठी परफेक्ट आहे. ही साडी वजनाने हलकी असल्यामुळे ती कॅरी करणंही तितकंच सोपं आहे.
आजकाल स्त्रियांच्या अंगावर सर्रास पाहायला मिळणारी साडी म्हणजे ऑर्गेंझा साडी. ट्रान्सपरंट कापड, त्यावर हेवी वर्क किंवा प्रिंटस असलेली ही साडी दिवाळीत नेसून तुम्ही स्टायलिश लूक क्रिएट करु शकता.
कधीही आऊट डेटेड न होणारी साडी म्हणजे बांधणीची साडी. सध्या बाजारात बांधणीच्या साडीमध्येही खूप व्हरायटी उपबल्ध आहेत. त्यामुळे ही साडी तुम्ही नक्की ट्राय करु शकता.
मुलांना स्वावलंबी करायचं असेल तर पालकांनी फॉलो करा या टिप्स