यंदाच्या दिवाळीत दूर करा मतभेद, आपल्या प्रियजनांचा रुसवा करा दूर

नात्यातील वितुष्ट दूर होऊन पुन्हा संवाद सुरु होईल.

प्रत्येक नात्यात रुसवे-फुगवे हे होतच असतात. परंतु, यंदाच्या दिवाळीत तुम्ही तुमच्या नातलगांसोबत असलेले मतभेद, मनभेद नक्की दूर करायचा प्रयत्न करा.

असे अनेक जण आहेत ज्यांना त्यांच्या नात्यातील मतभेद दूर करायचे आहेत. परंतु, यासाठी संवादाची सुरुवात कुठून करायची हे कळत नाही. 

यंदाच्या दिवाळीत तुमचं नात उजळवण्यासाठी एक पाऊल पुढे टाका. मनात कितीही द्विधा मनस्थिती असली तरीदेखील ज्यांच्याशी तुमचा अबोला आहे. त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा.

कसे आहात तुम्ही? यंदाची दिवाळी एकत्र साजरी करुयात का?  असे प्रश्न विचारुन तुमच्यातील संवादाची सुरुवात करा.

माफ करायला आणि माफी मागायला शिका. जर नात्यात काही मतभेद झाले असतील तर समोरच्या मोठ्या मनाने माफ करा. किंवा, तुमचं काही चुकलं असेल तर माफी मागा. शेवटी ही नातीच आयुष्याच्या शेवटापर्यंत साथ देतात.

जर मित्रपरिवारात मतभेद असतील तर त्यांना मेसेज किंवा फुलांच्या बुकेसोबत दिवाळीच्या शुभेच्छा द्या.

भाऊबीजेला बहिणीला काय गिफ्ट द्यायचं प्रश्न पडलाय? द्या 'या' खास भेटवस्तू

Click Here