दिव्या भारतीच्या आईने सांगितलं, अकाली मृत्यू झाला कारण..
दिव्या भारती. तिचा मृत्यू अकस्मात. त्यानं आजही अनेकांना हळहळ वाटते. अत्यंत लहान वयात तिनं उत्तुंग यश मिळवलं.
वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी तिने तब्बल २१ चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावलं होतं. यशाच्या शिखरावर ती होती.
विश्वात्मा, दिवाना, शोला और शबनम असे कित्येक गाजलेले चित्रपट करणारी दिव्या भारती एक दिवस अचानकपणे घराच्या छतावरून खाली कोसळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला..
तिने आत्महत्या केली की चुकून तिचा तोल गेला हे अजूनही एक न उलगडलेलं कोडंच आहे.. तिचं जाणं मात्र सगळ्यांना चटका लावून गेलं हे खरं...
यातच तिच्या आई मीता भारती यांचा व्हिडिओही काही वर्षांपुर्वी सोशल मीडियावर व्हायरल आहे. त्या म्हणतात तिच्या कुंडलीमध्येच बालमृत्यूचा योग असल्याचं सांगितलं होतं.
वयाच्या आठव्या वर्षी घातयोग होता, पण सुदैवानं ती वेळ टळली, १९ व्या वर्षी मात्र मृत्यूनं तिला गाठलं. ती आत्महत्या की खून अजून उत्तर सापडलेलं नाही.