हेल्दि फूड म्हणून हल्ली सर्रास खाल्ले जाणारे 'हे' पदार्थ अजिबातच हेल्दि नसतात. आराेग्यावर या पदार्थांचा परिणाम हाेऊ शकताे.
आता अनेक लाेकं डाएटचा विचार करून काेणते पदार्थ खायचे, काेणते खायचे नाही हे ठरवताना दिसतात. पण, तुम्ही काेणते पर्याय निवडता?
हेल्दि चिप्स खायचे म्हणून व्हेजिटेबल चिप्सचा पर्याय निवडला जाताे. या चिप्समध्ये मीठ, तेलाचा वापर केलेला असताे. जाे डाएटसाठी चांगला नाही.
लाे फॅट फूडचा अनेकजण डाएटमध्ये समावेश करतात. पण, या पदार्थांमध्ये सारख आणि अन्य गाेष्टींचे प्रमाण जास्त असते.
ग्लुटेन फ्री अनेक पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. डाएटसाठी चांगले म्हणून याचे सेवन केले जाते. पण, ग्लुटेन फ्री म्हणजे त्यात कॅलरीज कमी असतात असे नाही.
मल्टिग्रेन ब्रेडचा वापर वाढला आहे. साध्या ब्रेडऐवजी आता याला पसंती मिळत आहे. पण, याचा अर्थ ताे प्रत्येकवेळी हेल्दि असेलच असे नाही.
डाएट करताना पॅक्ड फ्रूट ज्युसला पसंती मिळते. पण, हे फ्रूट ज्युस ताजे नसतात. तसेच, यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असण्याचा माेठा धाेका आहे.
कमी खाऊन पाेट भरण्यासाठी एनर्जी बार खाल्ले जातात. प्रत्यक्षात यात फायबर आणि प्राेटीनच्या तुलनेत साखर जास्त असण्याचा धाेका जास्त असताे.
डाएट साेडा किंवा काेल्ड ड्रिंक्स प्यायली जातात. हेल्दी पर्याय म्हणून याचा विचार करू नका, यात आर्टिफिशल शुगर जास्त प्रमाणात असण्याचा धाेका असताे.