हा पराक्रम करणारा तो एकमेव खेळाडू
हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या संघाकडून IPL मध्ये धमाका करण्यास सज्ज आहे.
यंदाचा हंगाम रोहितसाठी खूपच महत्त्वपूर्ण असेल. कारण BCCI निवडकर्ते वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील संभाव्य २० खेळाडूंवर नजर ठेवून असणार आहेत.
तुम्हाला माहितीये का? रोहित शर्मा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने ७००० धावांसह IPL मध्ये हॅटट्रिकचाही डाव साधला आहे.
२००९ च्या हंगामात रोहित शर्मानं डेक्कन चार्जर्स हैदराबाद संघाकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्धच हॅटट्रिकचा डाव साधला होता.
डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळाडूच्या रुपात मिळवलेल्या IPL जेतेपदासह रोहित शर्मानं MI ला पाच वेळा IPL ट्रॉफी जिंकून दिली आहे. हा एक रेकॉर्डच आहे.
IPL च्या फायनलमध्ये सर्वाधिक दोन वेळा अर्धशतकी खेळी करणारा तो एकमेव कर्णधार आहे.
IPL च्या आतापर्यंतच्या १८ हंगामात रोहित शर्मा हा भारताकडून सर्वाधिक २१ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे.
IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीतही हिटमॅन रोहित शर्मा अव्वलस्थानी आहे.