टॉमॅटोपासून निर्माण झालाय बटाटा...? 

टॉमॅटो आणि बटाटा यांचा संबंध फक्त भाजी पुरता मर्यादित नाही. त्यांचा संबंध आपण विचार करतोय त्यापेक्षा जास्त घनिष्ठ आहे. 

टॉमॅटो आणि बटाटा यांचा संबंध फक्त भाजी पुरता मर्यादित नाही. त्यांचा संबंध आपण विचार करतोय त्यापेक्षा जास्त घनिष्ठ आहे. 

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की लाखो वर्षापूर्वी बटाटा हा टॉमॅटोच्या जातकुळीतूनच जन्माला आला आहे. 

जवळपास ९ मिलिनय वर्षापूर्वी जंगली टॉमॅटो हा प्लांट सेल Etuberosum सोबत हाब्रिडाईज झाला. याच सेलमधून बटाट्याची जातकुळीची देखील उत्पप्ती झाली आहे. 

नैसर्गिकरित्या क्रॉस ब्रिडिंगनंतर नवीन पेटोटा वंश आणि सध्याचा बटाटा यांच्यासह त्यांच्या १०० जातकुळी तयार झाल्या. 

शास्त्रज्ञांनी बटाटा आणि त्याच्यासारख्या शेकडो स्पेसीजच्या डीएनएचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना या जेनेटिक मेकअपचा उलगडा झाला.   

आश्चर्याची गोष्ट म्हणजे टॉमॅटो किंवा Etuberosum हे दोन्हीही कंदमुळं नाहीत. मात्र या दोन्हीच्या दोन महत्वाच्या जीन्स SP6A आणि IT1 यांच्या संकरापासून एक कंदमूळ तयार झालं. 

हे कंदमूळ थंड, कोरड्या आणि उंच भागात तग धरून राहिलं. हे कंदमूळ पाणी शोषून घेत जमिनीच्या खाली वाढलं. 

दक्षिण अमेरिकेच्या अँडीज पर्वतरांगांमध्ये याची वाढ झाली. तेथील वातावरणाशी ते छान जुळलं. 

काळ पुढे सरकत गेला अन् याच जातकुळीतून सध्याचा बटाटा निर्माण झाला. हा बटाटा फक्त अँडीज पर्वतरांगांमध्येच नाही तर त्याच्या बाहेरही आढळून येऊ लागला. 

शेकडो वर्षांनी शेतकऱ्यांनी या जंगली कंदमूळाचे उत्पादन सुरू केलं. म्हणून आज आपल्या ताटात हा बटाटा दिसतो.

Click Here